नागमोडी वाटेवर पायाखाली येणाऱ्या
पिवळ्या पानांच्या पायघड्यांचा तो स्पर्श,
त्यांचा तो विशिष्ट सुगंध,
चालताना होणारा त्यांचा तो आवाज,
बोलावतोय मला ;
सुर्योदयासोबत रंगांची उधळण करत,
काट्यातून फुलणारी ती रानफुलं,
साद घालतायत मला;
गृष्मतली ती पानगळ,
नव्या बहराची वाट बघत उभी असलेली
माझी गगनचुंबी झाडं वाट बघतायत,
माझ्या नव्या विचारांच्या नव्या पालविची ;
मन शांत करणारी वातावरणातली ती शांतता,
आतुर झालीय त्या सुखावणाऱ्या झुळूकेसाठी;
समुद्राच्या त्या अविरत लाटा
नाराजयत माझ्या थांबण्यावर,
पायाखालची वाळू सरकावत
एका नव्या प्रवासासाठी
अलगद नेऊ पाहतायत त्या मला
अथांग सागरात...