दशकांमागून सरली दशके | Ashwani Kachare

THE FOLLOWING POEM WAS SELECTED IN WINGWORD POETRY PRIZE 2023 LONGLIST.

दशकांमागून सरली दशके

अन् शतकांच्या गाथा ग

ना कर्तव्यांच्या सुटे वाटा

अन् वाट्याची कर्तव्ये ग

पथ चकव्याचा गोल,सरळ वा -

कुणास उमगत नाही ग

प्रवास कसला फरपट अवघी

जळात पानगळ वाहत जाई ग

कधी वाटते दिवस रात्र हे

नसते काही त्यांच्या लेखी

ज्यांचे डोळे मिटले ग

कृतज्ञ आंधळे कृतघ्न आंधळे

कानी कूजन नाही ग

कर्तव्याने शिणतो माणूस परी

जगास त्याची जाण नाही ग

कलियुगाची किमया सारी

महाभारत जेथे घडले ग

महिलेच्या जीवनातील हे

अनेकविध पैलू ग

महिला दिनाच्या शुभेच्छांना

दिवस एकच उजाडतो ग

सदिच्छा जी सदैव देई

तिला आयुष्यभर दंडवत ग

शब्द अपुरे जिथे वाहते

वात्सल्याची सरीता ग