बाळाचे मनोगत | Kavita Sangras Kanherikar

THE FOLLOWING POEM WAS SELECTED IN WINGWORD POETRY PRIZE 2023 LONGLIST.

आई म्हणू तुला कि मम्मा ?

सांगशील का हळुच कानात ?

पोटातील माझ्या हालचाली ,

सहन करतेस तु सार काही .

थकतेस का ग भार माझा वाहण्यात.

सांगशील का हळुच कानात?

किती घाबरतेस धक्का मला लागला म्हणून .

मोहरुन जातेस चाहूल माझी ऐकून.

तु प्रत्यक्ष कशी आहेस, दिसतेस मला स्वप्नात

सांगशील का हळुच कानात.

प्रॉमीस हं मी त्रास नाही देणार.

बोट तुझे नाही सोडणार.

नाते विणशील नं हळुवार धाग्यात.

सांगशील का हळुच कानात.

पोटातील पाण्यात दिसते मला ,

तुझ्या ऋधयाची छाया .

कशी श्वास घेतेस ग गुंतुनी माझ्या श्वासात ?

सांगशील का हळुच कानात ?

किती ग अजून वाट पाहू?

केव्हां तुझ्या हातावर जोजवून घेऊ !

घेशील का लवकर पदरात

सांगशील का हळुच कानात?