सर्वात आवडता व्यक्ति,
सगळा लांब का बरं राहतो?
ते किलोमीटर मधला अंतर
मला नाही वाटत, मानत दुरावा आणतो.
रडताना खांदा द्यायला तू नाहीस
पण,फक्त एका कॉल मध्ये मला समजावतो,
तुझा त्या आवाजात काय जादू आहे ?
तो आवाज कायम माझा हृदयात असतो.
तू जेव्हा परत येतोस,
माझ्यासाठी दिवाळी सारखे सुख आणतोस.
तू ते थोडे दिवस दिलेला आनंदी,
पुढचे काही महिने हसायला शिकवतो.
तू सोबत असताना असते मी बेफिकीर,
तुझा हातात हात, खांद्यावर माझे डोके.
माझा डोळ्यात प्रेम, तुझा तो अलगद स्पर्श,
तू आहेस या विचाराने आयुष्य होते सोपं.
मला आवडते, तुझा केसांना विस्कटून टाकायला,
तुला पिडायला, तूला त्रास द्यायला,
तुझी चेष्टा करायला, अणि तुझे गाल ओढायला,
चिडायला,ओरडायला कधीच कधी मुद्दाम भाव खायला.
तू जेव्हां जातोस, ते दुःख कागदावर व्यक्त होणार नाही,
तुझा कुशीत जाऊन मान मोकळ रडून,
तुला प्रेमाने काळजी घे सांगुन,
हरवले मी त्या शेवटचा मिठीत अणि तुझा आठवणीत.
पण मला माहिती आहे आपण आहोत एकमेकांसाठी,
लांब असलो तरी मान आहेत जुळलेली,
माझा तुझ्यावरचा प्रेम अफाट आहे,
तुला परत भेटायची मी वाट बघत आहे.