लाभला आपल्याला किती अनोखा वारसा
आज काल त्याचा विचार नाही होत फारसा
संस्कृती जोपासणे कर्तव्य आपले
सौभाग्य आहे जे आपण जपले
सणासुदीची पहा हि पहाट
पुरणपोळी चा हा थाट माट
रांगोळी ने सजते अंगण
शृंगाराने खुलते स्त्रीपण
वारसा हा ओझं ना मानावा
दडल्या यात कित्येक भावना
थोऱ्या मोठ्यांची देणगी जणू
आभार आपण त्यांचे मानू
पवित्रता ती प्रेमळ संवादाची
परिवारांच्या जिव्हाळ्याची
सन्मानाचा टिकवा वारसा
स्वाभिमान असे नाजूक जसा आरसा
नव्या जुन्या पिढीचा सुखद संवाद
नेतील वारसा पुढे एकसाथ
विसर ना पडो कधी
हे कळावं नाव्या पिढींना आधी
हा असा मिळाला अनमोल ठेवा
आभार तुझे खूप खूप देवा
पिढ्यान पिढ्या बदलल्या तरी
वारसा जपला जावा घरो घरी.