व्यथा स्त्रीची
रस्त्यावरून चालताना एखादी मुलगी दिसली की हरवून बसता भान
पण तिच्याकडे वाईट नजरेने बघताना खाली का जात नाही मान..
महिला पुरुषांच्या बरोबरीला आल्या म्हणून करता हो सत्कार
एवढ्या संघर्षातून बरोबरीला आल्या तरी थांबत नाही हो बलात्कार..
कधी बस,मध्ये कधी रेल्वेमध्ये,तर कधी नजरेनेही करता वार
आईच्या पोटातून जन्म घेण्याआधीच करून टाकता तिला ठार..
बाहेरचे तर आहेतच घरचा बापही जातो तिच्या वाट्याला
कसलाही विचार न करता
परका करतो बाप आणि लेकीच्या नात्याला..
चार-पाच वर्षांच्या मुलींना नाही ओळखता येत हो समोरच्याचे मन
म्हणूनच हिरावून घेता का त्यांचे आनंदी बालपणाचे क्षण..
कधी कधी प्रश्न पडतो का स्त्री सुरक्षित नाही आपल्या देशात
कारण तो नराधामच असतो घरी आपल्या भावाच्या वेशात..
एवढं करून उजळ माथ्याने फिरताय कसला एवढा माज..
तुम्ही पण एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला याची तरी ठेवा लाच..
विचार केला कविता करून काय उपयोग पण म्हटलं माझं मत तरी मांडेल
कदाचित माझी कविता वाचून
एखादा बलात्कार तरी थांबेल..